तेल उत्पादनात अमेरिकेची सौदी अरेबियाला धोबीपछाड

oil
लंडन : आता जगातील सर्वाधिक तेल उत्पादन करणारा देश जगात सर्वाधिक तेलाचा वापर करणारी अमेरिका बनला आहे. अमेरिकेने सौदी अरेबियाला मागे टाकले आहे.

अमेरिकेने २०१४ मध्ये प्रतिदिवशी ११.६ दशलक्ष तेल पिंप उत्पादन काढले तर सौदीने ११.५ दशलक्ष पिंप तेल उत्पादन काढले, अशी माहिती ब्रिटिश पेट्रोलियमच्या सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीत दिली आहे. रोज १०.८ दशलक्ष पिंप उत्पादन करून रशिया तिस-या क्रमांकावर आहे. तेल व वायू या दोन्ही प्रकारांमध्ये अमेरिकेने रशियाला मागे टाकले आहे. २०१४ मध्ये अमेरिकेने १२५०.४ दशलक्ष टन वायू उत्पादन काढले. तर रशियाने रोज १०६२ दशलक्ष टन उत्पादन काढले. ब्रिटिश पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने केलेल्या तेल संशोधनामुळे त्याला हे स्थान मिळाले आहे. जगातील तेल वापराचे प्रमाण २०१४ मध्ये केवळ ०.९ टक्क्याने वाढले. तर भारताचे ऊर्जा वापराचे प्रमाण ७.१ टक्क्याने वाढत आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणा-या अर्थव्यवस्थाचे तेल वापराचे प्रमाण वाढत आहे.

भारताची तेलाची मागणी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. भारताला रोज ४.३ दशलक्ष पिंप तेल लागते. तेलाच्या वापरात भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिका (१७.७९ दशलक्ष टन), चीन (१४.९ दशलक्ष टन), रशिया (६.३ दशलक्ष टन) तेल रोज वापरतो.

Leave a Comment