गुगलची लवकरंच गेमिंग सुविधा

google
वॉशिग्टन: ‘गुगल’च्या वतीने ऑनलाईन गेमिंगच्या शौकीनांसाठी ‘यू ट्यूब गेमिंग’ ही नवी सेवा लवकरंच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ‘गुगल’च्या अधिकृत ट्विटर अकौंटवर देण्यात आली आहे. ही सेवा वेबसाईट आणि अॅपच्या स्वरूपात संगणक, मोबाईल आणि टॅबवर उपलब्ध असणार आहे.

विविध प्रकारचे तब्बल २५ हजार गेम्स उपलब्ध असणा-या या सेवेमुळे ‘अॅमेझॉन डॉट कॉम’च्या ‘ट्विच’ सुविधेसमोर आव्हान उभे राहणार आहे. या सेवेद्वारे विविध गेम्स घेणे, चॅनेल सबस्क्राइब करणे, नव्या गेम्सच्या रेकमेंडेशन्स मिळविणे शक्य होणार आहे.

ही सुविधा या वर्षीच्या उन्हाळ्यात सर्वप्रथम अमेरिका आणि इंग्लंड या देशात उपलब्ध होणार असून त्यानंतर ती इतर देशात उपलब्ध करून दिली जाईल, असे ‘गुगल’च्या ट्विटवर नमूद करण्यात आले आहे.

मागील वर्षी ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ने ‘गुगल’पेक्षा मोठी बोली लावली आणि ९ हजार ७०० दशलक्ष डॉलर्स खर्च करून ‘ट्विच’ सेवा विकत घेतली. त्यामुळे ‘गुगल’ने ‘यू ट्यूब गेमिंग’ ही स्वत:ची सेवा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment