केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात ६ टक्क्यांनी वाढणार!

employee
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्यात पुढील महिन्यात आणखी सहा टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता त्यांना एप्रिलच्या वेतनापासून मिळू शकतो.

केंद्रीय कर्मचा-यांना सध्या ११३ टक्के इतका महागाई भत्ता मिळतो. त्यात आणखी सहा टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. जुलै महिन्यात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्राने दिली.

जानेवारी ते एप्रिल या काळातील महागाईच्या दरात झालेल्या चढउतारानुसार महागाई भत्ता ठरविला जाणार आहे. तथापि, नेमकी किती वाढ करावी, हा निर्णय मे आणि जूनमधील महागाई निर्देशांक जारी झाल्यानंतरच होईल. यापूर्वी जानेवारी महिन्यात महागाई भत्ता सहा टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. आताही याच प्रमाणात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.

Leave a Comment