या वर्षीच तयार झाल्या पुढील वर्षाच्या गोळ्या ?

medicine
भोपाळ – कशा पद्धतीने औषधांच्या बाजारात गैरप्रकार चालतात याचा प्रत्यय अनेकवेळा आल असून त्यातच आता एक नवीनच प्रकरण पुढे आले आहे. विशाल कंपनीच्या ताप तसेच वेदनाशामक गोळीच्या स्ट्रीपवर मॅन्युफॅक्चरींगची म्हणजेच निर्मितीची तारीख ४-१६ म्हणजेच पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यातील छापण्यात आल्याचे दिसते.

तसेच एक्सपायरी डेट मार्च २०१८ दिसून येते. कंपनीतील निर्मितीपासून या गोळ्या दुकानापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या मार्गातील कुणाच्याच ही चूक लक्षात आलेली नाही हे विशेष. येथील जेपी रुग्णालयाला ही औषधे पुरवली जातात. इंदुरमधील ही औषध कंपनी आहे. मध्यप्रदेश सरकारने हे औषध मोठ्या प्रमाणावर खरेदी केले आहे. प्रामुख्याने ताप आणि अंगदुखीसाठी ही गोळी देण्यात येते. स्वस्त असल्याने या गोळीचा खपही मोठा आहे. मात्र ताप किंवा अंगदुखी बरी होणार की नाही हे रामभरोसेच म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे. दरम्यान भोपाळच्या प्रमुख वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी वीणा सिंह यांना या गोळ्या दाखवल्या असता त्यांचाही यावर विश्वास बसला नाही. मात्र व्यवस्थित पाहिल्यानंतर त्यांनी स्टोअरमधून या गोळ्या मागवल्या. त्यावर पुढील वर्षाची तारीख छापल्याचे आढळून आले. यानंतर या औषधाची विक्री थांबवण्यात आली आहे. मात्र एवढी मोठी चूक लक्षात आल्याने वीणा यानी कॅमेऱ्यापुढे काहीही बोलण्यास नकार दिला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment