चिनी रिगल रॅपटॉर मोटर्सच्या तीन बाईक भारतात

detona
चीनमधील बाईक उत्पादक कंपनी रिगल रॅपटॉर मोटर्सने त्यांच्या तीन प्रिमिअर क्रूझर बाईक भारतात प्रथमच लाँच केल्या असून त्यासाठी फॅब्युलस अॅड बियॉण्ड मोटर्स इन इंडिया कंपनीशी सहकार्य करार केला आहे. त्यांनी हैद्राबादेत पहिली डिलरशीप दिली आहे.

या तीनही बाईक ३२० सीसीच्या व दोन सिलिंडरवाल्या आहेत. या बाईकच्या वेगाला स्पर्धा नाही असे सांगितले जात आहे. केवळ साडेतीन सेकंदात या बाईक ० ते ६० किमीचा वेग पकडू शकतात तसेच त्यांचा टॉप स्पीड आहे १३० किमी प्रति तास. डाटोना ३५०, क्रूझर ३५० व बॉबर ३५० अशी त्यांची नांवे असून या बाईकचे प्रीबुकींग सुरू झाले असून त्यासाठी ग्राहकाला सुरवातीला ५० हजार रूपये भरावे लागणार आहेत. कंपनी त्यांच्या या बाईक ३९ देशांत विकते आहे आणि त्यांच्या किमती ३ लाख ते साडेतीन लाख रूपयांच्या दरम्यान आहेत.

या तीनही बाईकचे इंजिन एकाच प्रकारचे असले तरी त्यांचा लूक व डिझाईन वेगळे आहे. अनेक रंगात त्या उपलब्ध आहेत.

Leave a Comment