हैदराबाद – मोजिला कंपनी भारतीय बाजारात लवकरच दीड हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत असून या स्मार्टफोनची जगातील सर्वात स्वस्त म्हणूनही नोंद होणार आहे. या फोनमध्ये अनेक अॅप आणि मोबाईल इंटरेनेटची सुविधा असणार आहे.
मोजिलाचा स्मार्टफोन अवघ्या दीड हजारात!
फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टवर हा स्मार्टफोन काम करणार आहे. सुरुवातीला इंटेक्स आणि स्पाईस कंपन्या हा स्मार्टफोन तयार करुन विकणार आहे. भारतातील लहान शहरात ग्राहकांसाठी २ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फोन महागडे समजले जातात. स्वस्त स्मार्टफोनमुळे नागरिकांना फायदा होईल, असे स्पाईस मोबाईल कंपनीचे म्हणणे आहे.
फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे फोन कदाचित अँड्रोईड ऑपरेटिंग सिस्टिम इतके लोकप्रिय होणार नाहीत, पण फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमवरील फोनला किमतीच्या बाबतीत मागे टाकणे अँड्रोईड फोनला कठीण जाणार आहे. अमेरिकेत फायरफॉक्सवरील फोन जवळपास साडेतीन हजार रुपयाला मिळतात. भारतात या फोनची किंमत आणखी कमी होईल, या उद्देशाने कंपन्या प्रयत्नशील आहेत.