कामाचा ताण, घरातील नित्याच्या झगझगी, अनपेक्षित घटना यामुळे बरेचदा आपला मूड ऑफ होतो. हा मूड बदलता यावा यासाठी आता कोणतीही औषधे खाण्याची अथवा पिण्याची गरज लागणार नाही. संशोधकांनी मूड बदलण्यासाठी कोणतेही साईड इफेक्ट नसलेले एक ड्रग तयार केले आहे. हे ड्रग डिजिटल आहे म्हणजे ते एक डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस मूड बदलणार्या पेशींवर नियंत्रण करण्याचे काम करते.
मूड बदलणारे डिजिटल ड्रग
हे डिव्हाईस डोक्यावर घालायचे आहे. ते दोन भागात आहे. त्यातला एक भाग कानशिलावर कपाळाच्या डोळ्याच्या बाजूला चिकटवायचा आहे तर दुसरा डोक्याच्या मागे लावायचा आहे. या उपकरणाला दोन मोड आहेत. मेंदूला शांती हवी असेल तर एक मोड वापरायचा व उर्जा हवी असेल तर दुसरा मोड वापरायचा. त्यासाठी फक्त ५ ते १० मिनिटांचा वेळ पुरेसा आहे. स्मार्टफोनवरील ब्ल्यू टूथच्या माध्यमातून हे डिव्हाईस नियंत्रित करता येते. वापराची वेळही कमी जास्त करता येते तसेच युजर तीव्रताही कमी जास्त करू शकतो.
या डिव्हाईसमध्ये कमी तीव्रतेची इलेक्ट्रीकल पल्स वापरली गेली आहे. याचा प्रभाव मूडसाठी जबाबदार असणार्या पेशींवर पडतो आणि मूड बदलला जातो. या डिव्हाईसची किमत आहे २२९ डॉलर्स.