रेल्वेचे क्लिन माय कोच अॅप

railway
दिल्ली- भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल व तुमचा डबा खूपच घाण असेल तर केवळ १५ मिनिटांत तो साफ सुथरा होण्याची व्यवस्था रेल्वेने केली असून त्यासाठी क्लिन माय कोच नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने प्रवासी डबा स्वच्छतेसाठी ऑनलाईन तक्रार दाखल करू शकणार आहेत आणि तक्रार दाखल होताच १५ मिनिटात सफाई कर्मचारी डबा साफ करून देणार आहेत. सेंट्रल रेल्वेने या अॅपच्या चाचण्या यशस्वी ठरल्याचे सांगताना दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात ही योजना लवकरच सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे.

सेंट्रल रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी या संदर्भात म्हणाले की, रेल्वेने हे अतिशय उपयुक्त अॅप विकसित केले आहे. वास्तविक रेल्वेत स्वच्छता कर्मचारी ऑन बोर्ड असतात पण प्रवाशांना त्यांना शोधून स्वच्छता करून घेणे बरेचदा अडचणीचे जाते. त्यामुळे या अॅपच्या सहाय्याने अर्ज करणे अतिशय सुलभ होणार आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हाऊस किपिंग डिपार्टमेंट स्थापन केले आहे. या विभागाकडे रेल्वेच्या सफाईबरोबरच ए,बी,सी क्लासची रेल्वे स्टेशन सफाईची जबाबदारीही सोपविली गेली आहे.

Leave a Comment