गुगलच्या स्वयंचलित कारला चीनची टक्कर

china
बिजींग – गुगलच्या स्वयंचलीत कारला टक्कर देण्यासाठी आता चीनही नवी स्वयंचलित कार लाँच करत असून येत्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ही कार लाँच करण्यात येणार आहे. चीनमधील वेब सर्व्हिस देणारी बैदू कंपनी ऑटो मोबाईल कंपनीच्या मदतीने ही नवी चालकरहित कार तयार करत आहे. यामध्ये आत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या स्वयंचलित कारमध्ये बैदू नकाशा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बैदू ब्रेन अशा काही सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार मानवी मेंदूच्या बुध्दीमत्तेनुसार काम करणार आहे.

काही दिवसांपुर्वी गुगलच्या चालकरहित कार अमेरिकत सुरू करण्यात आल्या आहेत. या स्वयंचलित कार संगणाकावर आधारित आहेत.

Leave a Comment