इस्रोला मिळाला स्पेस पायोनीअर पुरस्कार

isro
बंगळुर : अमेरिकेच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेतर्फे यावर्षीच्या स्पेस पायोनिअर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने अतिशय कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात भारताची मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविणा-या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोला सन्मानित करण्यात आले.कॅनडा येथील टोरॅन्टो येथे २० ते २४ मे या कालावधीत आयोजित ३४ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत इस्रोला विज्ञान आणि अभियांत्रिकी गटातील स्पेस पायोनिअर पुरस्कार प्रदान आला, अशी माहिती इस्रोने आपल्या वेबसाईटवर दिली आहे. आपले मंगळयान मंगळ ग्रहावर पाठविण्यासाठी अमेरिका, रशिया आणि युरोप यासारख्या देशांना वारंवार प्रयत्न करावे लागले. पण, इस्रोने अगदी पहिल्याच प्रयत्नात भारताचे मंगळ यान मंगळाच्या कक्षेत पाठविले. शिवाय, इतर देशांच्या तुलनेत भारताची ही मंगळ मोहीम सर्वात कमी खर्चात साकारली आहे.

Leave a Comment