अ‍ॅपलच्या ‘आयओएस-९’ मध्ये स्पिल्ट व्हिव्यू, लो-पॉवर मोड

ios-9
वॉशिंग्टन : आयफोन, आयपॅड, आयपॉडमध्ये वापरण्यात येणा-या आयओएस सॉफ्टवेअरच्या सुधारित आवृत्तीतील वैशिष्ट्यांबद्दल वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये माहिती देण्यात आली. पुढील महिन्यात ‘आयओएस-९’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि कमीत कमी जागा व्यापणारे अशीच ‘आयओएस-९’ ची प्राथमिक ओळख आहे.

अ‍ॅपलच्या सध्याच्या ‘आयओएस-८’ साठी तब्बल पाच जीबीची जागा लागत होती. त्या तुलनेत ‘आयओएस-९’ साठी अवघी १.३ जीबीचीच जागा लागणार आहे. याचा फायदा थेट वापरकत्र्यांना होणार आहे. आयफोन ४ एस आणि त्यानंतरचे आयफोन्स, आयपॉड टच ५ जनरेशन, आयपॅड २ आणि त्यानंतरचे आयपॅड, आयपॅड मिनी आणि त्यानंतरच्या आयपॅडमध्ये ‘आयओएस-९’ सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. · नव्या सॉफ्टवेअरमधील ‘नोट्स’ च्या माध्यमातून वापरकर्ता चित्रही काढू शकेल. त्याचबरोबर एखादा फोटोही नोट्समध्ये घेता येऊ शकेल. ‘नोट्स’ च्या माध्यमातून आरेखन करणेही शक्य होणार आहे. · अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्टड्ढेलियातील वापरकत्र्यांसाठी ‘न्यूज अ‍ॅप’ चाही समावेश. या माध्यमातून न्यूयॉर्क टाइम्स, ईएसपीएन, कॉंड नॅस्ट यांसारख्या वृत्तसंस्थांचा बातम्या वापरकर्ते आपल्या आवडी-प्रमाणे आणि गरजेनुसार बघू शकतील. · आयपॅडसाठी स्पिल्ट व्हिव्यूचाही समावेश. यामुळे आयपॅडधारक एकाच वेळी दोन अ‍ॅप्सचा वापर करू शकतील किंवा व्हीडीओ बघता बघता स्क्रीनच्या दुस-या बाजूवर एखादे अ‍ॅप वापरू शकतील.

Leave a Comment