थेरोरिस्ट यांचा दावा; सप्टेंबरमध्ये होणार जगाचा शेवट

world
न्यूयॉर्क – काही सिद्धांतकर्त्यांनी अर्थात थेरोरिस्ट मंडळींनी येत्या सप्टेंबर महिन्यात संपूर्ण जगाचा शेवट होईल, असा सिद्धांत जगात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मांडला आहे. पृथ्वीवर महाकाय उल्का पडून संपूर्ण जग नष्ट होणार असल्याचा या सिद्धांतकर्त्यांचा दावा आहे.

त्यांनी केवळ भाकीतच केले नाही, तर उल्का पृथ्वीवर धडकण्याची तारीखही जाहीर केली. त्यांच्या मते, येत्या २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत महाकाय उल्कापिंड पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने या सिद्धांतकर्त्यांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. यातील वृत्तानुसार, हा सिद्धांत मांडणार्‍या व्यक्तींनी गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत इंटरनेट आणि वेबसाईटच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली आहे. उल्का पृथ्वीवर धडकल्यानंतर संपूर्ण जग नष्ट होईल आणि संपूर्ण स्थिती पूर्ववत होण्यासाठी अर्थात नवीन जगाच्या निर्मितीसाठी किमान सात वर्षांचा कालावधी लागणार आहे.

नासाने फेटाळला दावा – हा दावा नासाच्या संशोधकांनी स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. जग नष्ट होईल, अशी कोणतीही उल्का किंवा धूमकेतू पृथ्वीवर पडणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे मोठी टक्कर होण्याची शक्यताही फारच कमी आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच अशाप्रकारचे कटकारस्थान रचले जात आहे, असा दावा नासाच्या प्रवक्त्याने केला.

Leave a Comment