सरकारच्या मान्यतेने पटायामध्ये रोज महिलांची खरेदी-विक्री

pattaya
पटाया : बँकॉकचे ‘पटाया’ हे शहर देहविक्रीसाठी जगप्रसिद्ध असून या शहरात दररोज संध्याकाळी महिलांचा मोठा बाजार भरतो आणि आश्चर्य म्हणजे या व्यवसायाला मात्र सरकारची मान्यता आहे.

देहविक्री व्यवसायासाठी जगामध्ये पटाया हे शहर प्रसिद्ध असल्यामुळे येथे मोठी पर्यटकांची गर्दी असते. हा बाजार खुलेआम चालतो. याला शासनाची मान्यता आहे. यासाठी एकच अट असून आरोग्य तपासणी सक्तीची आहे. पटाया येथे दररोज संध्याकाळी ‘पटाया बिच’ वर पंचेविस ते तीस हजार महिला, मुली उभ्या असतात. पंधरा ते चाळीस वर्षांपर्यंतच्या मुलींच्या गळ्यात आरोग्य तपासणीचे कार्ड अडकवलेले असते. या ठिकाणी देशी-विदेशी भारतीय महिलांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. या शहरात मसाज सेंटर मोठ्या प्रमाणावर असून हीच सेंटर वेश्याव्यवसायाची ठिकाणे आहेत. देहविक्रीचेही दर ठरलेले असून या मुली सोनं, दागिने, पैशाची लुटमारही करतात. या बीचवर मोठ्या प्रमाणात मुलींच्या संरक्षणासाठी व चोरी करण्यासाठी मुलांचीही फौज तैनात असते.

बँकॉक हे शहर रात्री अकराच्या आत बंद होते. तर याउलट पटायामध्ये रात्री सात वाजल्यापासून पहाटे सहापर्यंत यात्रेचे स्वरूप असते. देहविक्री करणा-या मुली या ग्राहकांना मसाज सेंटरच्या नावाखाली पक्के बिल देतात. त्यामुळे या व्यवसायामध्ये त्या प्रामाणिक असून शासनाला त्याचा करही भरतात हे विशेष. बँकॉक-पटायामध्ये मोठे व्यवसाय असल्याने लहान मुला-मुलींचा वापर केला जातो. बालकामगार कायदा, देहविक्री व्यवसायाचा कायदा नसल्याने सर्व व्यवसाय येथे बिनधास्तपणे चालू असतात. पटायामध्ये मोठ मोठे अश्लील शो आहेत. हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. तर ऑपरेशन करून लिंग बदलण्याचा कार्यक्रम कलाकारांचा आगळा वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम असून ते कलाकार विविध देशातून आणले जातात.

थायलंड आणि पटायामध्ये महिलांचा मोठा बाजार भरतो. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. याच्या मागचे कारण गरिबी हे असू शकते आणि पुरुष काहीच करत नाहीत, महिलाच सर्व ठिकाणी दिसून येतात. फेरीवाल्यापासून ते मोठ्या उद्योगात महिला आहेत आणि याच महिलांनी या देशाला तारले असून विकासाला हातभार लावला आहे.

Leave a Comment