जीओनीचा लवकरच २३.७ मेगापिक्सलचा ई ८ बाजारात

gionee
मुंबई : चीनमधील मोबाईल कंपनी जिओनीने खूप चर्चेनंतर आपल्या बहुप्रतिक्षित फोन ई८ आणि एम५ बद्दल खुलासा केला असून बीजिंगमध्ये १० जूनला कंपनी हे मोबाईल बाजारात उतरवणार आहे. कंपनीचे अध्यक्ष विल्यम लू स्वत: हे फोन लॉन्च करणार आहेत. याच दिवशी कंपनी नॅशनल जिओग्राफिकचे फोटोग्राफर फ्रित्ज हॉफमॅन यांच्यासोबत सहकार्याची अधिकृत घोषणा करणार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार ई८मध्ये २३.७ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल तर एम५मध्ये मॅरथॉन ६,०२० क्षमतेची बॅटरी असेल.