रशिया घालणार फेसबुक, ट्विटर, गुगलवर बंदी!

social
मॉस्को : रशियन सरकारच्या एका संस्थेने काही रशियन ब्लॉगर्सची माहिती दिली नाही तर गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांना रशियात बंदी घालण्याची धमकी दिली आहे. रशियाच्या एका सरकारी संस्थेने अलिकडेच फेसबुक, गुगल आणि ट्विटरकडे रशियातील ब्लॉगर्सची माहिती मागवली होती. ज्या ब्लॉगला दररोज तीन हजारापेक्षा अधिक व्हिजिटस आहेत अशा ब्लॉगची माहिती मागविण्यात आली होती. तसेच आंदोलनाचे समर्थन करणा-या आणि पूर्वपरवानगी न घेतलेल्या अशा कार्यक्रमांबाबतची माहिती काढून टाकण्याचीही सूचनाही केली होती. गतवर्षी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी इंटरनेटवर सरकार नियंत्रण मिळवू शकत नसल्याचे म्हटले होते.

मात्र सरकारची सध्याची कारवाई याविरुद्ध दिसून येत आहे. पूर्वपरवानगी नसलेल्या आंदोलनाबाबतची माहिती असलेल्या संकेतस्थळांना न्यायालयीन प्रक्रियेशिवाय ब्लॉग करण्याबाबतचा कायदा २०१४ मध्ये मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आता गुगल, फेसबुक, ट्विटरवर बंदी आणल्यास चीन, बुर्मा, उत्तर कोरिया आणि सौदी अरेबियाच्या रांगेत रशियाचाही नंबर लागेल अशी टीका करण्यात येत आहे.

Leave a Comment