उबेर, ओला टॅक्सीचालकांची कमाई १ लाखांवर

ola
मोबाईल अॅप बिझिनेस मॉडेल टॅकसी सेवा देणार्‍या उबेर, ओला, टॅक्सी फॉर शुअर सारख्या कंपन्यांनी भारतातील पारंपारिक टॅक्सीचालकांपुढे मोठेच आव्हान उभे केले असून या कंपन्यांचे टॅक्सीचालक महिना १ लाखांहून अधिक कमाई करत असल्याचे समजते. पारंपारिक टॅकसीचालक आजही महिना १५ ते २० हजारांची कमाई करत आहेत, त्या तुलनेत या कंपन्या चालकांना भरभरून पगार देत आहेत.

टॅक्सी फॉर शुअरचे सीईओ अरविंद सिंघल यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की टॅक्सी व्यवसायात मोठे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होते आहे. आमच्याकडे आज चांगले शिकलेले लोकही चालकाच्या नोकरीसाठी येत आहेत. भारतात टॅक्सी व्यवसाय ११ हजार कोटींच्या घरात आहे आणि त्यात दरवर्षी दोन अंकी वाढही होते आहे. चालक हे आमच्या व्यवसायाचा आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळे त्यांना चांगले पेमेंट देणे आवश्यकही आहे.

उबेर त्यांच्या चालकांना प्रत्येक भाड्यातील ८० टक्के रक्कम देते व हा पैसा थेट बँकेत जमा होतो. गर्दीच्या वेळी प्रत्येक फेरीमागे १५० रूपये बोनस दिला जातो. ओला एका दिवसांत सहापेक्षा अधिक फेर्‍या केल्या तरी बोनस देते. टॅकसी फॉर शुअर चालकाकडून भाड्यातील केवळ ८ ते १२ टक्के इतकीच रक्कम घेते. परिणामी चालकाच्या हातात महिना १ लाखांपर्यंत पैसे मिळतात.

Leave a Comment