बीएमडब्ल्यू इंडिया ब्रायडल फॅशन विक मध्ये प्रथमच ताजसमोर कंपनीच्या सिरीज सिक्स ग्रॅन कूपेचे दर्शन लोकांना झाले आणि सर्वांच्या नजरा एकदम स्तब्ध झाल्या असे समजते. कंपनीचे अध्यक्ष फिलीप वोन सार यांच्यासोबत यावेळी बॉलीवूड दिवा सोनाक्षी सिन्हाही होती.
बीएमडब्ल्यूच्या सिक्स सिरीज ग्रॅन कूपेचे झाले दर्शन
भारतातही ही पहिली फोर डोर कूपे आहे. वजनाला तुलनेने हलकी असलेली ही आलिशान कार ० ते १०० पर्यंतचा वेग फक्त ५.४ सेकंदात घेऊ शकते आणि तिचा कमाल वेग आहे २५० तासाला २५० किमी. गाडीचे इंटिरियअही अतिशय देखणे असून सीटसाठी महागड्या लेदरचा वापर केला गेला आहे. मॅन्युअल गिअर शिफ्ट सहजतेने करता यावेत यासाठी व्हीलवर शिफ्ट पॅडल्स दिली गेली आहेत. नवीन फिचर्समध्ये नवीन किडनी ग्रील, रिव्हाईज्ड बंपर्स, नवे अॅलॉय व्हील्स व एलईडी मल्टी बिम लँप दिले गेले आहेत.
ही गाडी अनेक रंगात उपलब्ध आहे आणि चालकाला आनंददायी ड्रायव्हींगचा अनुभव यात मिळतो असे सांगितले जात असून गाडीत ब्ल्यू टूथ, यूएसबी कनेक्शनही आहेत. गाडीची किमत आहे १ कोटी २१ लाख रूपये तीही एक्स शो रूम.