स्टीफन हॉकिंग स्वीकारणार वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग !

stephan
लंडन : ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वेदना असह्य झाल्या व आपण आप्तांसाठी ओझे आहोत असे वाटू लागले किंवा आपल्याकडून आता जगाला देण्यासारखे काही उरलेले नाही याची खात्री पटली तर वैद्यकीय मदतीने आत्महत्येचा मार्ग पत्करण्याचा विचार करू, असे मत व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मोटर न्यूरॉन डिसिजने ७३ वर्षांचे हॉकिंग आजारी आहेत. हॉकिंग यांनी सांगितले की, एखाद्याला त्याच्या इच्छेविरोधात जिवंत ठेवणे हे योग्य नाही. २०१३ मध्ये त्यांनी असे म्हटले होते की, ज्यांचे जगणे अवघड झाले आहे त्यांना साहाय्यभूत आत्महत्येचा मार्ग खुला असला पाहिजे. त्याचा गैरवापर मात्र होता कामा नये. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आपल्याला एकटेपणाची भावना जाणवते. तुम्ही काय गमावलेत असे विचारले असता त्यांनी सांगितले की, मी व्यवस्थित असतो तर पोहायला जाण्याची इच्छा होती.

Leave a Comment