मॅगीचे ‘वॉकआऊट’

maggi1
नवी दिल्ली – देशभरात पाच राज्याने आरोग्याला हानीकारक असल्याने मॅगीवर बंदी घातल्याने नेस्ले इंडियाने मात्र दुकानातून मॅगी परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कंपनीने मॅगी पूर्ण सुरक्षित असल्याचा दावाही केला आहे.

ग्राहकांमध्ये निर्माण झालेला घटनाक्रम आणि गोंधळामुळे भ्रम निर्माण करण्यात आला आहे. यामुळे मॅगी परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, असेही कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीनंतर गुजरात, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर काही राज्य मॅगीची तपासणी करत आहेत.

Leave a Comment