नुडल्स मार्केटला मॅगी विवादामुळे ४ हजार कोटींना चुना

maggi
मुंबई : नूडल्स मार्केटला तब्बल ४ हजार कोटी रुपयांना मॅगीमुळे सुरू झालेल्या वादाने चुना लागला असून बाजारात मॅगीची भागीदारी ७० टक्क्यांवर आहे. शिसे आणि एमएसजीचे अधिक प्रमाण आढळून आल्याने काही राज्यांत मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे केवळ नेस्ले कंपनीलाच नव्हे, तर अन्य कंपन्यांच्या उत्पादनालाही त्याचा फटका बसला आहे.

हरिश बिजूर कन्सल्टन्सचे संचालक हरिश यांनी सांगितले की, मॅगीच्या वादामुळे केवळ मॅगीच नव्हे, तर अन्य उत्पादनालाही फटका बसला आहे. अर्थात नूडल्सचे सर्वच ब्रँड संशयाच्या भोव-यात अडकले आहेत. मॅगी वादामुळे ग्राहक केवळ बड्या कंपन्यांकडेच नाही, तर स्थानिक ब्रँड संशयाच्या दृष्टीने पाहात आहेत. नेस्ले मॅगीने गेल्या तीन दशकांपासून भारतातील नूडल्स बाजारात आपला नावलौकिक मिळविला आहे. याशिवाय दिग्गज कंपनी असलेल्याआयटीसीच्या सनफिस्ट यिप्पीची बाजारात १८ ते २० टक्के भागिदारी आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचे ब्रँडही बाजारात चांगलाच चालतो.

मॅगीवर प्रश्न उपस्थित होताच कंपनी एवढी अडचणीत येईल, असा कधीच विचार आला नव्हता. परंतु हा वाद सुरू झाल्याने कंपनीला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. दरम्यान, आयटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सनफिस्ट यिप्पीच्या गुणवत्तेवर पूर्णतः विश्वस्त आहोत. एवढेच नव्हे, तर कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.

Leave a Comment