विषाणू प्रयोगशाळांची क्षमता वाढविणार; विषाणू विज्ञान संस्थेच्या संचालकांची ग्वाही

mers
पुणे – मध्य-पूर्वेतील देश, विशेषतः सौदी अरेबियात आढळणा-या एमईआरएस या विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळांची क्षमता वाढविणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. डी. टी. मौर्य यांनी दिली, रमझान महिन्यात देशातून अनेक यात्रेकरू सौदीला जात असल्याने खबरदारी घेण्यात येणार आहे.

श्वसन विकाराला कारणीभूत ठरणारा हा विषाणू प्रथम तीन वर्षापूर्वी सौदी येथे आढळला. नुकताच मध्य पूर्वेचा प्रवास करून परतलेल्या कोरिया व चीनच्या प्रवाशांमध्ये या विषाणूंचा प्रादुर्भाव आढळल्याने त्याबाबत जगभरात काळजी घेतली जात आहे.

काय आहे एमईआरएस?
हा श्वसनविकाराचा जीवघेणा विषाणू आहे.
अनेकदा संसर्ग होऊनही त्याची लक्षणे दिसून येत नाही.
या संसर्गावर ठोस उपचार अथवा प्रभावी प्रतिबंध उपलब्ध नाही
आजपर्यंत सौदी, युरोप आणि इतर देशात १ हजार १४९ रुग्ण
संसर्गामुळे ४३१जणांचा मृत्यू, मृत्युदर ३८ टक्के

विमानतळावर तपासणी
एमईआरएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यपूर्व देशात जाणा-या व तिकडून परत येणा-या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्यात येणार आहे, अशी माईती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment