घर आणि कार खरेदी करणाऱ्यांना एसबीआयसह चार बँकांचा दिलासा

loan
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांनी घर आणि कार खरेदी करणाऱ्यांना दिलासा दिला असून कर्जाच्या व्याजदरात ०.३ टक्क्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, देना बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेने कपात केली आहे.

कालच रेपो रेट दरात रिझर्व्ह बँकेने पाव टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर या सर्व बँकांनी व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचा नवा व्याजदर ८ जूनपासून लागू होईल. रिझर्व्ह बँकेने जानेवारीपासून तीन टप्प्यांमध्ये व्याजदरात ०.७५ टक्के कपात केली आहे, तर एसबीआयने दोन महिन्यात व्याजदर ०.३० टक्क्यांनी कमी केला आहे.

अलाहाबाद बँकेनेही व्याजदरात ०.३० टक्के कपात केली आहे. तर देना बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली असून त्याचबरोबर देना बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेने कर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केल्यामुळे आता बँकेच्या कर्जाचा व्याजदर १० टक्के झाला आहे. या कपातीनंतर व्याजदराशी संबंधित सर्व कर्ज स्वस्त होणार आहेत.

Leave a Comment