टचस्क्रीन कपडे बनविणार गुगल!

google
वॉशिंग्टन : आता स्पर्श पडद्यासारखे (टचस्क्रीन) कपडे बनवण्याचा प्रकल्प गुगल या तंत्रज्ञान कंपनीने हाती घेतला आहे. कापड उद्योगात त्यामुळे क्रांती घडून येणार आहे. हे कपडे वाहकतेचा गुणधर्म असलेल्या धाग्यांपासून बनवण्यात येतात.

‘जॅकार्ड’ असे या प्रकल्पाचे नाव असून गुगलच्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेत याबाबत प्रयोग चालू असून त्यात स्मार्ट धागे वापरण्यात येणार आहेत. ते स्पर्श संवेदनशील असतील व नेहमीच्या धाग्यांबरोबर विणले जातील. स्पर्शपडद्यात वापरले जाणारे धागे बारीक, धातूच्या संमिश्रापासून बनवलेले असतात. ते कापसाच्या व रेशमी धाग्यांबरोबर वापरता येते. जॅकार्ड धागे असे वापरले जातात, ज्यात ते वापरणा-याला कुठे वापरले आहेत हे दुप्पट जाडीवरून समजते पण एरवी ते बाहेरून कळत नाही. वहनक्षमता असलेल्या धाग्यांचा वापर यात केला जातो. या कपड्यांना स्पर्श कळतो किंवा हातांच्या इशा-यांवरून कृतीचा संदेश मिळतो. या कपड्यात मोठ्या पृष्ठभागात ते धागे विणले जातात त्यामुळे आंतरक्रियात्मक पृष्ठभाग मोठा असतो, असे या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

यातील सर्किटस हे जॅकेटच्या बटनपेक्षा मोठे असणार नाहीत, वहनक्षमता असलेले धागे जोडून ते तयार केले जातील. इलेक्टड्ढॉनिक्सचा हा सूक्ष्म अवतार येथे वापरला जाणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्हाला या कपड्यातून इलेक्टड्ढॉनिक उपकरणांना संदेश देता येऊ शकतो. यंत्राला समजू शकणा-या अलगॉरिथमचा वापर यात केला जातो. स्पर्श व हातवा-यांतून मिळणारी माहिती बिनतारी पद्धतीने मोबाईल फोनकडे वाहून नेली जाते. इतर अनेक उपकरणेही त्यावर चालवता येतात. त्यातून ऑनलाईन सेवा, अ‍ॅप्स चालवता येतात. गुगलने या धाग्यांचे प्रात्यक्षिक दाखवले असून त्यात फिलीप्सचे रंगीत दिवे स्पर्शाच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात येतात. गिझमॅगने दिलेल्या माहितीनुसार या कपड्यावर टिचकी मारली तर दिवे चालू होतात किंवा बंद होतात व विविध रंगांचे दिवे लावण्याचा क्रमही त्यात आणता येतो, त्याची प्रकाशमानता कमी-जास्त करता येते. जॅकार्ड हा फॅशन उद्योगासाठी एक मोठा कॅनव्हास आहे, त्यावर ते काहीही सुविधा देऊ शकतील. विशेष करून डिझायनर्सना या स्पर्शधाग्यांचा वापर करण्यासाठी कल्पनाशक्ती दाखवता येईल.

Leave a Comment