वॉशिंग्टन : २९ जुलैपासून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या जगभरातील युजर्ससाठी ‘विंडोज टेन’ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. अलिकडेच मायक्रोसॉफ्टच्यावतीने त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वीच्या ‘विंडोज’ च्या व्हर्जनमधून वगळण्यात आलेल्या स्टार्ट मेन्युचा ‘विंडोज टेन’ मध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
जुलैपासून ‘विंडोज टेन’ विनामूल्य उपलब्ध
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच अधिकाधिक युजर्सपर्यंत पोचण्यासाठी मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८.१ वापरकत्र्यांसाठी विनामूल्य अपग्रेडेशनची सुविधा देण्याची जानेवारीमध्ये घोषणा केली होती. ‘विंडोज टेन’ हे होम, मोबाईल, प्रो, एंटरप्राईज आणि एज्युकेशन एडिशनमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी होम एडिशनम अधिकाधिक ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ती डेस्कटॉप पीसीज, लॅपटॉप्स आणि अन्य डिव्हाईसेसमध्ये वापरता येणार आहे. ‘विंडोज टेन’ मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे लॉगीनची सुविधा यासह फोटो, नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध विंडोज अॅप्सही असणार आहेत. तर ‘विंडोज प्रो’ एडिशनही व्यावसायिक वापरासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मायक्रोेसॉफ्टने म्हटले आहे.