रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात

rbi
मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने आज नवीन तिमाहीसाठी आपले पतधोरण जाहीर केले असून रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पाँइटने कपात केली आहे. गुंतवणूक आणि अर्थगतीला चालना देणारी दर कपात रिझव्‍‌र्ह बँकेकडून केली जाईल असा विश्वास अर्थतज्ज्ञ, उद्योजकांनी व्यक्त केला होता त्यानुसार बँकेनी ही कपात केली आहे.

ज्या दराने रिझव्‍‌र्ह बँकेकडून देशातील वाणिज्य बँकांना अल्पमुदतीत कर्ज अदा केले जाते तो रेपो दर आणि वाणिज्य बँकांना आपल्या एकूण ठेवीपैकी ज्या प्रमाणात निधी रिझव्‍‌र्ह बँकेकडे राखून ठेवावा लागतो ते रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) दोहोंमध्ये किमान ०.२५ टक्के कपातीची सार्वत्रिक अपेक्षा ठेवण्यात आली होती. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांच्या प्रमुखांना रेपो दर व सीआरआर दोहोंमध्ये कपात अपेक्षित होती. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो दरात कपात केल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Leave a Comment