बीएसएनएलचे १५ जूनपासून देशभरात रोमिंग कॉल मोफत

bsnl
नवी दिल्ली- बीएसएनएलचे रोमिंग कॉल १५ जूनपासून देशभरात मोफत होणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्यामुळे राज्याबाहेर वास्तव्य असणाऱ्या किंवा सतत देशभरात प्रवास करावा लागणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बँकेसारखे व्यवहार आता पोस्टाला करता येणार आहेत. त्यासाठी लागणारे आवश्यक परवाने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जुलै-ऑगस्टमध्ये मिळणार असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे. स्पेक्ट्रम वाटप आणि व्यापारी धोरणाबाबत मंत्रीमंडळ या महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment