तब्बल साडे चौदा करोड रुपयांना पर्सचा लिलाव !

auction
हॉंगकॉंग – नुकताच एका पर्सचा हॉंगकॉंगमध्ये लिलाव झाला असून या लिलावात या पर्सची किंमत हजारात किंवा लाखात नसून करोडोत ठरली आहे. ही पर्स साडे चौदा करोड रुपयांत विकली गेली आहे.

ही पर्स कुठल्याही कापडापासून किंवा चामड्यापासून नाही तर चक्क मगरीच्या कातड्यापासून बनविण्यात आली आहे. तसेच या बॅगवर १८ कॅरेटचं सोनं आणि हिर्‍यांचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच या पर्सची किंमत करोडोत आहे. जगातील आत्तापर्यंतची ही सर्वात महागडी पर्स ठरली आहे. यापूर्वी अमेरिकेत सर्वात महागडी पर्स विकली गेली होती. लाल रंगाची ही पर्स देखील मगरीच्या कातड्यापासून बनविली होती. त्या पर्सची किंमत १२ करोड रुपये होती.