जोरात ओरडा आणि काढा सेल्फी

trigger
कॅमेर्यांासाठी ट्रीगर बनविणार्‍या ट्रीगरट्रॅप कंपनीने ट्रीगरट्रॅप सेल्फी नावाचे नवे अॅप बाजारात आणले असून या अॅपच्या सहाय्याने सेल्फी काढण्यासाठी केवळ तुमच्या आवाजाचा वापर पुरेसा ठरणार आहे. म्हणजे केवळ जोरात ओरडायचे आणि सेल्फी काढायचा. कारण या अॅपमुळे आवाजाच्या आधारावर फोनचा कॅमेरा ऑन होतो व सेल्फी काढला जातो. मात्र हे अॅप फक्त अॅपल स्मार्टफोनवरच वापरता येणार आहे.

या अॅपमुळे सेल्फी काढणे अतिशय सुलभ आहेच पण काढलेल्या सेल्फीचा प्रिव्ह्यूही हे अॅप दाखवेल. अर्थात लगेच दुसरी सेल्फी घ्यायची असेल तर स्क्रीन क्लिअर करावा लागेल व त्यासाठी पुन्हा एकदा जोरात ओरडावे लागेल. योग्य डेसिबलचा आवाज निघाला की स्क्रीन क्लिअर होईल व दुसरी सेल्फी काढता येईल. या अॅपमध्ये स्मार्ट फेस डिटेकशन सिस्टीमही दिली गेली आहे. त्यामुळे नुसता ओरडा ऐकला तरी जोपर्यंत कॅमेर्‍यात चेहरा किवा इमेज दिसत नाही तोपर्यंत सेल्फी घेतली जाणार नाही.

Leave a Comment