जगातील सर्वाधिक उंच निवासी इमारत मुंबईत

building
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगातील सर्वाधिक उंच निवासी इमारत उभारली जात असून द वर्ल्ड वन टॉवर असे तिने नामकरण केले गेले आहे. लोढा डेव्हलपर्सतर्फे उभारल्या जात असलेल्या या इमारतीचे इंटीरियर जगप्रसिद्ध इंटिरियर डिझायनर जॉर्जियो अरमानी यांनी केले आहे. जगातील सर्वाधिक उंच इमारत असल्याची नोंद सध्या दुबईतील बुर्ज खलिफाच्या नावावर असली तरी ही पूर्ण निवासी इमारत नाही.

द वल्ड वन टॉवर ही 117 मजली इमारत आहे. तिच्यात पहिला मजला 75 फुटांवर बांधला गेला आहे. या इमारतीत दोन, तीन, चार सदनिकांचे आलिशान फ्लॅट असून त्यांच्या किंमती 8 कोटी ते 100 कोटींपर्यंत आहेत. 23 एकर जागेत ही इमारत उभी केली जात आहे आणि तिच्या बांधकामाचा खर्च आहे 2 हजार कोटी. ही इमारत 17 साली पूर्ण होणार आहे. फ्लॅट खरेदी करणार्‍यास बिल्डरतर्फे खासगी जेट, रोल्स रॉईस ची सुविधा दिली जाणार आहे.

या इमारतीत 300 फ्लॅटस आहेत. जिम क्लब हाऊस, स्पा, क्रिकेट पीच ही आहे. पहिले सहा मजले पार्किंगसाठी आहेत. त्यानंतर 40 व्या मजल्यापर्यंत 8 कोटीपासून पुढील किंमतीचे फ्लॅटस आहेत. 41 ते 80 मजल्यापर्यंतच्या फ्लॅटसाठी प्रायव्हेट पूल आहेत तर 81 पासून पुढच्या मजल्यांवरील घरे डुप्लेक्स वर्ल्ड मॅन्शन आहेत. त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. इमारतीची उंची आहे 1450 फूट.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *