सुपर गर्लची ‘सुपर’ कामगिरी

tube
मोटारसायकलने ३ सेकंदात ५७३ ट्युब्स फोडण्याचा अनोखा विक्रम
विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावल्यानंतर पुण्यातील माऊंट कारमेल स्कूलच्या खुशी परमारने आज एका नवीन विक्रमाला गवसणी घातली. मोटरसायकलवर अवघ्या ३ सेकंदात तब्बल ५७३ ट्युबलाईट्स फोडण्याचा अनोखा विक्रम १३ वर्षाच्या खुशीने केला. या विक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यंगेस्ट अचिव्हर्स म्हणून करण्यात आली.

tube1

या आधीही खुशीने अनेक विक्रम नोंदवले आहेत. भारतातील सर्वात लहान मुलींमध्ये स्कुबा डायव्हिंग प्रकारात जास्तीत जास्त तास पाण्यात राहून विक्रम नोंदवला होता. तिच्या या विक्रमाची नोंद २०१४ मध्ये किंग बुक ऑफ वर्ल्डने घेऊन खुशीला वॉटर गर्ल या किताबानेही गौरविण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा गुहा इथे तिने १५ किलोमिटरमध्ये पोहण्याचा विक्रम २ तास ५२ मिनिटांचा आहे.

विक्रम केल्यावर खुशी म्हणाली की, आजच्या मुली देखील मुलांप्रमाणेच सक्षम असतात, हे जगाला दाखवून देण्यासाठी मी हा स्टंट केला. मला मुलगी असल्याचा अभिमान वाटतो, मुलगी पालकांवर ओझे नाही, तर ती प्रत्येकच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने काम करू शकते.

Leave a Comment