ब्राऊन मनी- घरात लपलेला खजिना

old-things
प्रत्येक भारतीयाच्या घरात ब्राऊन मनीच्या रूपाने मोठा खजिना लपलेला आहे मात्र तो त्यांना अजून ओळखता आलेला नाही. भारतात केवळ शहरी भागात ४६२०० कोटी रूपयांचा ब्राऊन मनी आहे तर ग्रामीण भागात तो यापेक्षाही अधिक प्रमाणात आहे. हा ब्राऊन मनी म्हणजे दुसरे तिसरे कांही नसून घरात अडगळीत पडलेले, नको असलेले सामान.

जुन्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या ओएलएक्स कंपनीच्या क्रस्ट सर्वेक्षणातून हे निष्कर्ष काढले गेले आहेत. या कंपनीच्या मते हे जुने सामान वेळेवरच मार्गी लावले म्हणजे विकून टाकले तर मालकाला पैसा मिळतो, वस्तू वापरात येतात आणि देशाच्या अर्थकारणातही त्याची मोठी मदत होते. प्रत्येक भारतीयाच्या घरात अशी अडगळ असतेच असते. मात्र त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही त्यामुळे हे सामान फुकटच वाया जाते. त्याचा ना धड उपयोग होतो ना त्यातून कांही कमाई होते.

ओएलएक्स, क्विकर या सारख्या कंपन्या घरबसल्या तुम्हाला घरातील नको असलेल्या वस्तूंची विक्री करण्याची संधी देत आहेत.यामुळे जुन्या सामानाचा पैसा मिळतो, घराची साफसफाई होते आणि वस्तू खरेदी करणारा त्या वापरतोही. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अडगळी साठविण्याचे प्रमाण खूपच मोठे आहे. केवळ शहरी भागातील घरातून असे ४६ हजार कोटपेक्षा अधिक रकमेचे सामान पडून आहे. ही रक्कम देशासाठी लक्षात घेतली तर त्या खर्चातून १२५ पेक्षा अधिक वेळा मंगळयान मंगळावर पाठविता येईल, भारतीय खाद्य निगमचे सर्व कर्ज फिटेल. ही रक्कम म.गांधी ग्रामीण रोजगार योजनेसाठीच्या रकमेपेक्षाही दीडपट अधिक असल्याचे समजते.

Leave a Comment