चेहरा ओळखणारे एटीएम चीनमध्ये तयार

face
चीनी संशोधकांनी देशातील पहिले चेहरा ओळखून ऑपरेट होणारे एटीएम तयार केले असल्याचे वृत्त आहे. या एटीएमला सरकारनेही मान्यता दिली असून येत्या कांही दिवसांत ही एटीएम बाजारात उपलब्ध होणार आहेत. चोर्‍या रोखण्यासाठी ही एटीएम अतिशय उपयुक्त असल्याचा दावाही केला जात आहे. साऊथ चायना मॉर्निग पोस्टने या संदर्भातली बातमी दिली आहे.

बातमीनुसार त्सिंगहुआ विश्वविद्यालय आणि झेकवान टेक्नॉलॉजी यांनी परस्पर सहकार्याने हे एटीएम तयार केले आहे. चीनमधली एटीएम परदेशातून आयात केलेली असतात मात्र या एटीएमचे तंत्रज्ञान पूर्ण स्वदेशी आहे. एटीएममधून पासवर्ड चोरून वा अन्य मार्गाने पैसे ढापण्याच्या घटना चीनमध्ये बर्‍याच प्रमाणात होतात. त्या चोर्‍यांवर या मशीनमुळे लगाम बसेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment