दिल्लीतील रस्त्यावरचे अन्न विषारी !

street-foof
नवी दिल्ली : चाट खाणा-यांचे प्रमाण राजधानी दिल्लीत अधिक असून रस्त्यालगतच्या फूड भांडारमध्ये चटक-मटक खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु अशा लोकांसाठी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्लीत स्ट्रिट फूडसंबंधी मेल टुडेने केलेल्या सर्वेक्षणात बर्गरमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरिया अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे, तर अन्य पदार्थही विषारी असण्याचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे.

फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्डस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने पश्चिम आणि मध्य दिल्लीतील १०० चाट दुकानांचे सॅम्पल घेतले आणि त्याची तपासणी केली. त्यात कॉलिफॉर्म बॅक्टेरिया अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले. समोसा, गोलगप्पा, मोमोज, बर्गरमध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरियाची संख्या तब्बल २४०० पोहोचल्याचे दिसून आले, तर किमान संख्या ५० पर्यंत होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉलिफॉर्म बॅक्टेरिया शरीरातील पचन व्यवस्था बिघडवतो आणि असे अन्न खाणारी मंडळी डायरियाचा बळी ठरण्याचा धोका अधिक असतो. तप्त वातावरणातून बचाव करायचा असेल, तर असे अन्न सेवन करणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटस्, केटरिंग आणि न्यूट्रिशनच्या डॉ. अर्पिता शर्मा यांनी गोलगप्पाच्या पाण्यात कॉलिफॉर्म चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यात मोठ्या प्रमाणात घाण असल्याचेच लक्षण आहे. विशेष म्हणजे या अभ्यासातून फे्रेंचाईजीपेक्षा ठेल्यावरील अन्न चांगले असल्याचेही आढळून आले आहे. वेंडरांच्या स्टॉलवरील अन्नापेक्षा रस्त्यालगतच्या ठेल्यावरील अन्न चांगले आहे. त्याचे कारण म्हणजे ठेलेवाले हे ऑर्डर दिल्यानंतर पदार्थ बनवितात आणि फेंचाईजी स्टॉलवाले अगोदरच तयार करून ठेवतात आणि ऑर्डर मिळाल्यानंतर ते गरम करून सेवा देतात. परंतु एकदाच तयार करून ठेवून ते गरम करून खाण्यास देणे हे तर अधिक घातक आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment