जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

volcano
टोकियो- जपानमधील कुचिनोएराबुजिमा बेटावर एका ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आहे. यानंतर प्रशासनाने तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच या उद्रेकाला सर्वाधिक पाचवे स्थान दिले असून सरकारने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. ज्वालामुखी सक्रिय झाल्यामुळे अतिशय तप्त वायू आणि लाव्हारस बाहेर निघत आहे. तसेच ज्वालामुखीतून निघालेल्या राखेचे लोट नऊ हजार मीटर उंचीपर्यंत आकाशात पसरले आहेत. बाहेर पडलेली राख समुद्रात पडल्याने पाणीही प्रदूषित झाल्याचे जपानच्या राष्ट्रीय प्रसारकानी म्हटले आहे.

या बेटावर सुमारे १५० जण राहात असून यामधील कोणीही व्यक्ती जखमी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. हे बेट जपानचे मुख्य दक्षिणी बेट क्यूशू येथील क्यूशू इलेक्ट्रिक पॉवरच्या सेनदई मुख्य संयंत्रापासून सुमारे १६० किमी दक्षिणेस आहे.

Leave a Comment