चिरतरूण राहण्याचे महिलांना मिळणार वरदान

chirtarun
आपण कायम तरूण दिसावे अशी मानवाची जन्मापासूनच इच्छा असते. त्यातही महिला वर्ग वय लपविण्यात माहिर समजला जातो. वय वाढू लागले की म्हातारपणाची चिन्हे शरीरावर दिसू लागतात. केस पांढरे होतात, चेहरा, अंगावर सुरकुत्या येऊ लागतात, त्वचा सैल पडते, स्नायू सैल पडतात आणि एकंदरीत शरीराचा डौलच डळमळू लागतो. मात्र या सार्‍या संकटातून महिला वर्गाची सुटका होण्याचा काळ आता फार दूर नाही. चिरतरूण राहण्याचे वरदान त्यांना लवकरच मिळू शकणार आहे .

संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे आढळले की एक असे एन्झाईम आहे जे वय वाढल्यानंतर शरीरात होणार्‍या बदलांसाठी कारणीभूत आहे. त्याचे नामकरण ११ बिटा एचएसडी १ असे केले गेले आहे.२० ते ४० वयोगटातील महिलांच्या तुलनेत ६० व त्यापुढच्या वयोगटातील महिलांमध्ये या एन्झाईमची पातळी वाढते.हे एन्झाईम सुरकुत्या पडणे, शरीर स्नायू सैल पडणे, त्वचा लोंबणे यासाठी कारणीभूत असते. अर्थात हे एन्झाईम पुरूषांतही असते मात्र वयानुसार ते पुरुषांवर वेगळे परिणाम घडवत नाही.

संशोधकांनी मग हे एन्झाईम ठराविक वयानंतर शरीरात पैदाच होऊ नये यासाठी संशोधन सुरू केले आणि तसे औषधही तयार केले आहे. बाजारात हे औषध येत्या ५ वर्षात दाखल होईल आणि महिलांना चिरतरूण राहण्याचे वरदान देईल असा संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment