१ जूनपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात

opne-university
पुणे – येत्या १ जूनपासून जगातील सर्वात मोठ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होत असून २७ जूनपर्यंत चालणाऱ्या या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ४ लाख ८५ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

विद्यापीठाने देशभरात विविध ठिकाणी ८५० परीक्षा केंद्रे स्थापन केली असून त्यातील ३२ केंद्रे परदेशात तर ८७ केंद्रे कैद्यांसाठी कारागृहात स्थापन करण्यात आली आहेत. भारतीय नागरिकांसाठी शहरी तसेच ग्रामीण भागातही केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध असून त्याची प्रत विद्यार्थ्याला टपालाद्वारेही पाठविण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या विभागीय केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती विद्यापिठाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहेत.

Leave a Comment