हुंदाईची सोनाटा अँड्राईड ऑटोसहची पहिली कार

auto
हदाईने त्यांची सोनाटा कार अँड्राईड ऑटोसह सादर केली असून अशा प्रकारची ही पहिलीच कार ठरली आहे. गुगलने अँड्राईड ऑटो व अॅड्राईड स्मार्टफोनचा इंटरफेस सारखाच ठेवल्याने नेव्हीगेशन बरोबरच अँड्राईड ऑटो युजरला पर्सनल रिमांईंडर, डेस्टीनेशन सूचना, कॅलेंडर अपॉईंटमेंट, हवामान, संगीत यांचाही वापर करणे अतिशय सुलभ आणि सोयीचे बनले आहे.

अर्थात अँड्राईड ऑटोसाठी युजरकडे अँड्राईड लॉलीपॉप ५.० अथवा त्याच्या पुढचे व्हर्जन असणे गरजेचे आहे. यूएसबी केबलने युजर त्याचा स्मार्टफोन कारच्या यूएसबी पोर्टला जोडू शकणार आहे. सध्या ही सुविधा फक्त अमेरिकेत उपलब्ध असून लवकरच ती अन्य देशातही दिली जाणार आहे. ह्युंडाई त्यांच्या अन्य कार मॉडेलमध्येही ही सुविधा देणार आहे.

कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार अँड्राईड ऑटो चालकाचे लक्ष भरकटू देत नाही त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होतो. ऑटोचा वापर करताना स्मार्टफोनचा स्क्रीन लॉक होत असल्याने चालकाला वारंवार वाकून स्क्रीनकडे पहावे लागत नाही.

Leave a Comment