नवी दिल्ली : ‘गूगल आय/ओ डेव्हलपर कॉन्फरन्स’मध्ये अँड्रॉईडच्या नव्या व्हर्जनची गूगलने घोषणा केली असून गूगलचे हे नवे व्हर्जन गॅझेटप्रेमींसाठी या डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे.
लवकरच येणार गूगलची ‘अँड्रॉईड एम’ ऑपरेटिंग सिस्टिम
आकर्षक लूकसह क्वालिटीवरही ‘अँड्रॉईड एम’ या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये भर दिला गेला आहे. याआधीच्या ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षा अधिक युजर फ्रेंडली हे व्हर्जन आहे, अशी माहिती गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी सांगितले.
गूगलने गेल्या वर्षी याच कॉन्फरन्समध्ये ‘अँड्रॉईड एल’ लॉन्च केला होता. अँड्रॉईड एलला अँड्रॉईल लॉलीपॉप असे नाव दिले होते. मात्र ‘अँड्रॉईड एम’ या ऑपरेटिंग सिस्टिमला अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही. ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम सध्या केवळ गूगल नेक्सस ५, नेक्स ६ आणि नेक्सस ९ यावरच उपलब्ध होईल.