देवावरच्या रागातून करायचा मंदिरात चोर्‍या

thief
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात पोलिसांनी फत्त* मंदिरातच चोर्‍या करणार्‍या प्रेमसिंग राजगौड याला अटक केली आहे. विशेष म्हणजे गेली २५ वर्षे तो मंदिरात चोर्‍या करतो आहे मात्र पोलिसांच्या ताब्यात तो प्रथमच सापडला आहे. या चोर्‍या तो देवावरच्या रागातून करत असल्याचे त्याने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रेमसिंग पाच वर्षाचा असताना त्याचे आईवडील रस्ते अपघातात गेले. त्याच्या वडीलांच्या नावाची जमीन काकांनी बळकावली इतकेच नव्हे तर तो ज्या नातेवाईकांकडे राहिला त्या सर्वांनी त्याचा छळ केला. प्रेमसिंग सांगतो प्रत्येकवेळी मी देवाचा मला मदत कर म्हणून मनापासून धावा केला मात्र देवाने मला एकदाही मदत केली नाही. त्यामुळे देवाशी माझे वैर निर्माण झाले. १५ व्या वर्षी त्याने प्रथम मंदिरात त्या रागावरच चोरी केली आणि ४० व्या वर्षी तो पोलिसांच्या ताब्यात सापडला..

प्रेमसिंगने पहिली चोरी त्याच्या गावाजवळच्या केसली जैन मंदिरात केली आणि त्यानंतर सुमारे २५ मंदिरातून त्याने चोर्‍या केल्या आहेत.