सिंह चक्क म्हशींच्या कळपाला घाबरून झाडावर…

lion
नैरोबी : एक असा फोटो समोर आला आहे, की जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. म्हशींच्या कळपाला घाबरून जंगलाचा राजा सिंह चक्क झाडावर चढला आहे. मात्र म्हशींच्या कळपाने झाडाभोवती फेर धरून सिंह खाली पडण्याची वाट पाहली. ६३ वर्षीय माजी सैन्य अधिकारी चाल्र्स कॉमिन केनियाच्या मासाई मारा रिझव्र्हचा फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांनी हे दृश्य पाहिले. चाल्र्स आणि त्यांच्या पत्नीला याची अजिबात जाणीव नव्हती की,
आपल्या ट्रीपच्या अखेरीस त्यांना असे काही दृश्य पाहायला मिळेल.

कॉमिन यांनी सांगितले की, आपल्या गाईडसोबत त्यांनी फक्त म्हशींचा पाठलाग सुरू केला होता आणि म्हशी नवजात सिंहाचा पाठलाग करत होत्या. अचानक एक सिंह झुडुपामधून त्या छोट्या सिंहाला वाचवायला आला आणि तो झाडावर चडला. मात्र काही काळाने त्याची पकड ढिली होऊ लागली आणि तो झाड़ावरून खाली पडला. ज्याची सर्व म्हशी वाट पाहत होत्या.

Leave a Comment