सोनीचे एक्सपिरीया एम फोर अॅक्वा व सी फोर लाँच

sony
सोनीने त्यांचा सर्वात स्वस्त वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ स्मार्टफोन एक्सपिरीया एम फोर अॅक्वा आणि सेल्फी सिरीजमधील दुसरा एक्सपिरीया सी फोर हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. पैकी एम फोर अॅक्वाची विक्री सुरू झाली आहे तर सी फोर जूनमध्ये विक्रीसाठी येणार आहे. एम फोरची किंमत २४९९९० रूपये आहे.

एम फोर अॅक्वा अर्धा तास दीड मीटर पाण्यात ठेवला तरी तो खराब होत नाही. हा डस्टप्रूफही आहे. ५ इंची स्क्रीन, स्कॅ्रच रेसिस्टंट ग्लास, २ जीबी रॅम, ८ जीबी व १६ जीबी मेमरीचे दोन व्हेरिएंट, १३ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ५.० ओएस अशी याची फिचर्स आहेत तर सी फोर दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनसाठी २५ एमएन वाईड अँगल कॅमेरा, डुअल सिम, ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी, कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. हा फोन पांढरा, हिरवा आणि काळ्या रंगात उपलब्ध होणार आहे.

दोन्ही फोनसाठी टूजी, थ्रीजी, फोर जी, वायफाय, ब्ल्यू टूथ, यूएसबी, जीपीआरएस, एज अशी कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स दिली गेली आहेत.

Leave a Comment