मुंबई आयआयटीच्या संचालकपदासाठी रतन टाटांचे नांव

ratan
मुंबई – अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटी संचालकपदाचा विवादास्पद राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या जागेसाठी उद्योगपती रतन टाटा यांचे नांव सुचविले गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मानवसंसाधन मंत्रालयाने या पदासाठी निवडलेल्या पाच नावांची यादी या खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे पाठविली गेली असून त्यावर राष्ट्रपतीं अखेरचे शिक्कामोर्तब करतील असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्यांच्याकडे दिल्या गेलेल्या पाच नावांपैकी कोणाचीही आयआयटीच्या व्हिजीटर संचालकपदी नियुक्ती करू शकतात अथवा अन्य नावे सुचविण्यासाठीही सांगू शकतात. मात्र आत्तापर्यंत राष्ट्रपतींनी कोणतीही फाईल परत पाठविलेली नाही त्यामुळे संचालक पदासाठी या पाच जणांतून अंतिम निवड होईल असे समजते. माजी संचालक अनिल काकोडकर यांचा कार्यकाल ११ मे रोजी पूर्ण होणार होता मात्र त्यांनी १२ मार्च रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.