जियोनी ईलाईफ एट येणार १०० एमपी कॅमेरा तंत्रज्ञानासह

elife
चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनीने त्यांचा १०० एमपी कॅमेरा तंत्रज्ञान असलेला स्मार्टफोन ईलाईफ एट नावाने बाजारात आणण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष विलीयम लू यांनी हे तंत्रज्ञान असलेला असलेला कॅमेरा लवकरच लाँच करण्यात येत असल्याचे व यात लॉसलेस झूम सेसर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असल्याचे सांगितले.

प्रत्यक्षात या फोनमध्ये २३ एमपीचा मेन कॅमेरा आहे मात्र झूम लेन्स सेंसर तंत्रज्ञानामुळे फोर के क्वालीटीचे व्हीडीओ शूटिग आणि १०० एमपी क्वालिटीचे फोटो शूट केले जाऊ शकतात असे कंपनीचा दावा आहे. फोनची किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही. ४.८ इंची इमोलेड डिस्प्ले, अँड्राईड लॉलीपॉप ५.० ओएस, ३२ जीबी मेमरी, कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फिंगरप्रिंट रिडर, ड्युअल सिम, एलईडी फ्लॅश व टूजी, थ्रीजी, फोर जी कनेक्टीव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment