गूगल दोन नेक्सस स्मार्टफोन यंदा लॉन्च करणार

nexus
मुंबई : गूगल यावर्षी ऑक्टोबरमध्ये दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. गूगल दरवर्षी एक स्मार्टफोन किंवा एक टॅब्लेट लॉन्च करण्याची परंपरा मोडून यंदा पहिल्यांदाच दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमधील एक हँडसेट एलजी तर दुसरा हँडसेट हुवाई ही कंपनी तयार करणार आहे. एलजीकडून याआधीही गूगलने स्मार्टफोन तयार करुन घेतले आहे.

एलजीचा स्मार्टफोन आकाराने लहान, तर हुवाईचा मोठा असणार आहे. गूगलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, यंदा नेक्ससचा कोणताही टॅब्लेट लॉन्च होणार नाही. त्यामुळे गूगलच्या दोन नव्या कोऱ्या नेक्सस हँडसेट्सच्या लॉन्चिगची उत्सुकता मोबाईलप्रेमींना लागली आहे.

Leave a Comment