किसान वाहिनीचा प्रचार करणार अमिताभ

amitabh
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेल्या किसान वाहिनीचे प्रमोशन अमिताभ बच्चन करणार आहेत. या वाहिनीची लोकप्रियता वाढावी यासाठी एक अभियान करण्यात येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमिताभ हे वेगवेगळ्या माध्यमातून या वाहिनीचे प्रमोशन करतील. प्रसार भारतीचे अतिरिक्त महानिर्देशक रंजन मुखर्जी यांनी अमिताभ या वाहिनीचे प्रमोशन करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या वाहिनीचे काम शेतकऱ्यांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवून करण्यात येणार आहे. यामध्ये शेती, हवामान आणि शेतीविषयक संबंधित बातम्या पाहायला मिळतील.

Leave a Comment