गुगल आणणार स्मार्ट खेळणी

teddy
गुगलने नुकताच नवीन पेटंटसाठी अर्ज केला असून हे पेटंट लहान मुलांच्या खेळण्यांसाठी आहे. अर्थात ही खेळणी साधी खेळणी नाहीत तर ती आहेत स्मार्ट खेळणी. म्हणजे घरात ही खेळणी ठेवलेल्या खोलीत कोण येतेय याची नोंद ही खेळणी घेतील आणि मालकाला त्यासंदर्भातली सर्व माहिती देतील. त्यासाठी खेळण्यात स्पीकर्स, मायक्रोफोन लावले गेले आहेत.

खोलीत कुणीही प्रवेश केला की ही खेळणी अॅक्टीव्हेट होतील. डोळ्यांनी ही खेळणी संपर्क साधू शकतील. त्यांनी कोणत्या प्रतिक्रिया द्यायच्या याचा प्रोग्राम अगोदरच फिड केलेला आहे. त्यामुळे ही खेळणी वायफाय, ब्ल्यू टूथ, वायरलेसही कनेक्ट राहतील तसेच क्लाऊड सेवेच्या मदतीनेही ती कंट्रोल करता येतील. मुलांसाठी वापर करताना गाणी बदलणे, चित्रपट लावणे अशी कामेही ही खेळणी करणार आहेत. म्हणजेच खेळण्यांच्या रूपातील ही आधुनिक गॅजेटसच आहेत आणि त्यात व्हॉईस, मोशन, सेन्सिंग फिचर्सचा वापर केला गेला आहे.

Leave a Comment