आजपासून दूरदर्शनची किसान वाहिनी

doordarshan
नवी दिल्ली : आजपासून दूरदर्शनतर्फे ‘डीडी किसान’ ही शेतकरी-केंद्रित एक वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या वाहिनीची सुरवात करण्यात येणार आहे. केबल आणि डायरेक्ट टु होम (डीटीएच) सेवा पुरवठादारांसाठी त्यांच्या ग्राहकांसाठी डीडी किसान या वाहिनीचे प्रक्षेपण करणे बंधनकारक असेल. प्रत्येक राज्यात शेतकरी आहेत, त्यामुळे केबल कायद्यानुसार डीडी किसान ही मस्ट कॅरी वाहिनी बनविण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे प्रक्षेपण करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment