आता ऑनलाईन यूपीएससी पूर्वपरीक्षेचे अर्ज

upsc
नवी दिल्ली – आता यंदापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या आयएएस, आयपीएस पूर्वपरीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत. यूपीएससी परीक्षेचे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत असे तीन टप्पे असतात. यंदा ही परीक्षा २३ ऑगस्ट रोजी देशातील तीन हजार केंद्रावर घेतली जाणार आहे.

आयोगाच्या www.upsconline.nic.in या वेबसाईटवर उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे. २३ मे ते १९ जूनपर्यंत हे अर्ज भरता येतील. या अर्जामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस आदींचे पर्याय द्यायचे आहेत, असे लोकसेवा आयोगाने कळवले आहे.