स्मार्टफोन हॅकिंगचा अमेरिकेकडून प्रयत्न

hacking
वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए) सुरक्षेच्या कारणास्तव स्मार्टफोनवर नजर ठेवण्यासाठी गुगल आणि सॅमसंगच्या अ‍ॅप स्टोअरवरील डेटा लिंक्स हॅक करण्याची योजना करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन वृत्त देणा-या ‘द इंटरसेप्ट’ ने दिलेल्या याबाबत वृत्त दिले आहे.

त्यामध्ये अमेरिकेने ब्रिटन, कॅनडा, न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने अशाप्रकारची योजना तयार केली आहे. एनएसएच्या एका माजी कंत्राटदाराने जाहीर केलेल्या एका कागदपत्रांतील माहितीवरून तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. गुप्तचर सेवांच्या २०११ आणि २०१२ साली झालेल्या बैठकांमध्ये याबाबत चर्चा करण्यात आल्याचेही या अहवालात आढळले आहे. अ‍ॅपशी जोडणारे डेटा कनेक्शन हायजॅक करून अनधिकृतपणे यूजर्सच्या स्मार्टफोनवर सॉफ्टवेअर इन्स्टॉलकरून त्याद्वारे यूजरची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. तसेच संभाव्य शत्रूला लक्ष्य करण्यासाठी स्पायवेअरचाही वापरण्यात येणार होता, असेही अहवालात म्हटले आहे. या वृत्तानंतर गुगल आणि सॅमसंगने कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment