सिझेरियन करताना डॉक्टरने पेशंटच्या पोटातच सोडला मोबाईल

jordan
डॉक्टर आणि ऑपरेशन यांच्यासंदर्भात अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. रूग्णाचे ऑपरेशन करताना त्याच्या पोटात कात्र्या, सुर्‍या, बँडेज, ग्लोव्हज राहून गेल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. मात्र जॉर्डनमधील एका डॉक्टरने बाळंतपणासाठी सिझेरियन ऑपरेशन करताना पेशंटच्या पोटात मोबाईल ठेवण्याची कमाल करून दाखविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जॉर्डनची राजधानी अम्मान येथील हनान नावाच्या महिलेचे सिझेरियन करावे लागले. त्यासाठी ती खासगी रूग्णालयात दाखल झाली आणि तिचे ऑपरेशन पारही पडले. जखमेमुळे तिला पोटात दुखत होतेच त्यातच तिला पोटात कांही तरी हलत असल्याची जाणीव झाली. त्रास कमी होईना तेव्हा तिची सोनोग्राफी केली गेली. त्यात पोटात कांही तरी वस्तू असल्याचे दिसले तेव्हा पुन्हा तिची जखम ओपन केली गेली. त्यावेळी डॉक्टरचा मोबाईल तिच्या पोटातच राहून गेल्याचे लक्षात आले. मोबाईल व्हायब्रेट होत होता त्यामुळे महिलेला सतत पोटात काहीतरी होतेय अशी भावना होत होती. मोबाईल पोटात विसरण्याचा हा पहिलाच प्रकार असला तरी संबंधित महिलेने डॉक्टरवर केस दाखल केली आहे. आता त्याचा हा विसराळूपणा त्याला किती महागात पडतो याची प्रतीक्षा केली जात आहे.

Leave a Comment